X Close
X
9819022904

शिखर धवन विश्वचषकाला मुकणार


Shikhar-Dhawan1-copy-1

मुंबई : मिशन वर्ल्डकपवर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला जबर धक्का बसला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवनला तीन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळता येणार नाहीत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या शिखर धवनला दुखापतीने ग्रासले आहे. सध्या फॉर्मात असलेल्या शिखर धवनला संघाबाहेर बसावे लागणार असल्याने तो टीम इंडियाला मोठा झटका मानला जात आहे. शिखर धवनच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे.

विश्वचषक स्पर्धेत नुकत्याच झालेल्या सामन्यात शिखर धवनने दमदार शतक ठोकून भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. रोहित शर्माच्या साथीने त्याने चांगली सलामी दिली होती.

(PRAHAAR)