X Close
X
9819022904

शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाब देत तर कुठे डोरेमॉननी केले चिमुकल्यांचे स्वागत


Untitled-2-1-300x213
मुंबई : शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरे मॉन, छोटा भीमसह आलेली मंडळी.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत.. सोमवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी असेच वातावरण होते. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा सोमवार १७ जूनपासून सुरू झाल्या. शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडाताना दिसत असताना काही चिमुकल्यांच्या चेहरयावर नवीन वर्गाचा, नवीन कपडे, दप्तर याचा आनंदही दिसत होता. मुलांना शाळेचा पहिला दिवस लक्षात रहावा यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत केले जात आहे. मुलांच्या स्वागताला ‘सुस्वागतम’ अशी भलीमोठी रांगोळी काढण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीतील विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले. सुनेत्रा यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देत त्यांच्या हाताला धरून त्यांना शाळेत आणले. नव्याची नवलाई असली तरी सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. एवढे सारे असूनही चिमुकले बावरलेच. आई-बाबा आपल्या सोबत नाही, या विचाराने चिमुकल्यांना अश्रु रोखता आले नाही. त्यांची समजूत काढताना शिक्षकांच्या नाकी नऊ आले. (PRAHAAR)