X Close
X
9819022904

विकी-कतरिनाच्या लग्नाच्या टेलिकास्टसाठी Amazon Prime सोबत ८० कोटींची डील?


Vicky-Katrinas-wedding-2
मुंबई : उद्योगपती विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती आणि अखेर आता हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची फंक्शन्स सुरू झाली असून, दोघेही उद्या ९ डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या, यामध्ये खूपच प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली जात आहे. एवढ्या प्रायव्हसीमागचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. चाहत्यांना विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे प्रत्येक तपशील बघायला मिळणार आहे. परंतु, चाहत्यांना ही सर्व दृश्ये एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. त्यामुळे एकही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, म्हणून इतकी प्रायव्हसीची काळजी घेतली जात आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क अॅमेझॉन प्राईमला (Amazon Prime) विकले आहेत. ८० कोटींमध्ये हा करार पूर्ण झाला आहे. या करारामुळेच कतरिना आणि विकीने त्यांच्या पाहुण्यांना एनडीए करारावर स्वाक्षरी करायला लावली आहे, जेणेकरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आधी लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही. विकी आणि कतरिना सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवरामध्ये लग्न करणार आहेत. या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. मंगळवारी रात्री विकी आणि कतरिनाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या फंक्शनमध्ये दोन्ही कुटुंबांनी एकत्र खूप एन्जॉय केला. काय आहे एनडीए करार? एनडीए करारामध्ये पाहुण्यांना प्रायव्हसीची काळजी घेणे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणाहून कोणताही फोटो लीक करण्यास मनाई आहे. पाहुण्यांसाठी एक टीप शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तुमचे फोन तुमच्या खोलीतच ठेवा आणि समारंभातील कोणतेही फोटो पोस्ट करू नका किंवा सोशल मीडियाचा वापर करू नका.’ पुढच्या वर्षी रिलीज होईल व्हिडीओ! विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या या सीरीजमध्ये त्यांच्या रोमान्सपासून ते रोका समारंभ आणि राजस्थानमधील चार दिवसांच्या फंक्शन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट दिसणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा हा व्हिडीओ २०२२ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याआधी २०१९ मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाच्या शूटची डील केली होती. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला १२० पाहुणे येणार आहेत. यापैकी काही पाहुण्यांची मिळालेली क्षणचित्रे… (PRAHAAR)