X Close
X
9819022904

रोहित पवारांचे क्रिकेटमधील योगदान काय?


415499-cricket-gen-700

आजोबांनी चिअरलीडर्स आणल्या, हे महाशय काय आणता बघूया

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर आमदार रोहित पवार यांचे क्रिकेटमधील योगदान काय, हे समजले नाही, अशी खोचक टीका भाजप नेते नीलेश राणे यांनी केली आहे.

नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, एमसीएच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.

 

रोहित पवार यांचे आजोबा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील यापूर्वी ‘एमसीए’चे अध्यक्ष राहिले आहेत. शरद पवार हे २००१-०२ मध्ये, तसेच २०१३ मध्ये ‘एमसीए’चे अध्यक्ष राहिले आहेत. यावरुन नीलेश राणेंनी आमदार रोहित पवार व शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

(PRAHAAR)