X Close
X
9819022904

राज्यात ८,१५९ नवे कोरोनाबाधित, १६५ मृत्यू


Corona-0980E07052021052059

 

मुंबई (प्रतिनिधी) : मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात बुधवारी १६५ बाधित रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात कालपर्यंत एकूण ६०,०८,७५० बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे, तर राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये, तर ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात कालपर्यंत ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी बाधितांचा आकडा कमी होत नाही. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही बाधितांपेक्षा जास्त होती. काल पुन्हा एकदा बाधितांची संख्या कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे.

(PRAHAAR) (PRAHAAR)