X Close
X
9819022904

रशिया-गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २४० प्रवाशांचा जीव धोक्यात


Airport-4G66

नवी दिल्ली : रशियाहून गोव्यात येणारे विमान उडवून देण्याच्या धमकीनंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या विमानात ७ क्रू मेंबर्स, दोन लहान मुलांसह २४० प्रवाशी प्रवास करत आहेत.

अजूर एअर लाईन्सचे हे विमान रशियाच्या मॉस्कोमधील पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याकडे निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान, वैमानिकाला सुरक्षेसंबंधित अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे.

 

(PRAHAAR)