X Close
X
9819022904

योगगुरू स्वामी आनंद गिरींना अटक


anandd
लखनऊ : प्रयागराजच्या निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरू स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. ३८ वर्षीय योगगुरू स्वामी आनंद गिरी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आहेत. योगगुरू स्वामी आनंद गिरी देश-विदेशात ते योग शिकवतात. २०१६ च्या एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. साधू-संत पीठ थोपटून भक्तांना आशीर्वाद देतात. एका विदेशी महिलेलाही तशाच प्रकारचा आशीर्वाद दिला. परंतु पाठ थोपटून दिलेल्या आशीर्वादाच्या आडून मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. मारहाणीसारखा कोणताही प्रकार झाला नव्हता. आनंद गिरी यांनी काल दुपारी १२.३५ वाजता अटक करण्यात आली आहे. योगगुरू आनंद गिरी यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारात महिलांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. प्रार्थनेसाठी त्या महिलांना आनंद गिरींनी आमंत्रण दिलं होते. २०१६ ला त्यांनी आपल्या घरात कथित स्वरूपात २९ वर्षीय महिलेबरोबर मारहाण केली. त्यानंतर २०१८ मध्येही गिरींनी ३४ वर्षीय महिलेबरोबर कथित स्वरूपात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. (PRAHAAR)