X Close
X
9819022904

युवा उत्थान फाऊंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम, यूपीएससीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा


upsc 22-2-17

मुंबई : सालाबादप्रमाणे यावर्षीही युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या संस्थेमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. शनिवार २० जुलै रोजी सायंकाळी ४. ३० ते ७.३० वाजेपर्यंत मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अमोल गवळी यांनी दिली. त्यासोबतच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त सौ. प्राजक्ता लवंगारे – वर्मा, मुंबई वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पडवळ, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

युवा उत्थान फाऊंडेशन ही संस्था युवकांनी एकत्र येऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याकरिता स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिकाधिक संख्येने प्रशासनात यावेत व त्यांनी देशाच्या प्रशासनाचे नेतृत्व करावे असा युवा उत्थान फाऊंडेशनचा मानस आहे.

यूपीएससी यशस्वी उमेदवारांनी खडतर व प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले हे यश समाजासमोर आदर्श आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशातून प्रेरणा घ्यावी याच स्तुत्य हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे अशी भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल गवळी यांनी व्यक्त केली.

(PRAHAAR)