X Close
X
9819022904

मुलांसोबत स्वत:लाही घडवा..


Mumbai:

निलेश प्रभू

मागील लेख-मालिकेत आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य करिअरची निवड करण्यासंदर्भातील आवश्यक असणा-या महत्त्वाच्या बाबींची माहिती घेतली. सोबतच उज्ज्वल कारकीर्द घडविण्यासाठी अभ्यासेतर उपक्रमामधील सहभागाचे महत्त्व जाणून घेतले. डीएमआयटी चाचणीच्या सहाय्याने आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखून त्याच्यातील गुणांना प्रोत्साहन आणि त्याच्या कमजोर गुणांमध्ये त्याच्या पाठीशी उभे राहून ध्येय निश्चिती आणि योग्य मार्ग निवडून यश निश्चिती करणे याबाबत माहिती घेतली.

संपूर्ण लेख-मालिका आपल्या पाल्याच्या जडणघणीवर केंद्रित होती; परंतु आपल्या पाल्याचे भवितव्य घडविताना स्वत: पालकांनाही स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे.

आज बहुतांश पालक शिक्षित आहेत. पाल्याच्या करिअर बाबत जागरूक आहेत. मुबलक प्रमाणात उपलब्द असलेल्या माहितीच्या आधारे, करिअर मार्गदर्शकांच्या मदतीने आपल्या पाल्याला त्याच्या उज्ज्वल कारकिर्दीच्या मार्गावर नेण्यास सक्षम आहेत; परंतु आजही कित्येक व्यक्ती आपल्या कामाबद्दल वा कारकिर्दीबद्दल समाधानी नाहीत. आपल्या कामातून चांगले पैसे मिळत असूनही ‘जॉब सॅटिसफॅक्शन’ नाही अशा ब-याच तक्रारी कानावर पडत असतात. आयुष्यात काहीतरी करण्याचे राहून गेल्याची भावना सतत त्याना अस्वस्थ करीत असते. काहीतरी वेगळे करावे यासाठी त्याची सतत धडपड असते. स्त्रियांच्या बाबतीत मुलांच्या संगोपनात गेलेली १५ ते २० वर्षे मातृत्वाचे समाधान देत असली तरीही व्यक्ती म्हणून करिअर घडविण्याची क्षमता असूनही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी हातून गेल्याची सल सतत मनाला हुरहूर लावीत असते.

आई-वडिलांनी शाळेत पाठवलं. दहावीनंतर मित्रांनी निवडलेल्या क्षेत्रात / विद्यालयात प्रवेश घेतला. विशिष्ट पदवी का घेतली माहीत नाही. पदवीनंतर काय करायचे माहीत नाही. नोकरीची निवड नेमकी कशी करायची माहीत नाही. कुणीतरी सुचविलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे आणि उपलब्द पदावर काम सुरु करायचे, अशी कैफियत मांडणा-यांची संख्या फार मोठी आहे. अर्थात त्यातही काहींनी चुकून का होईना योग्य क्षेत्र निवडले आणि प्रगतीही केली; परंतु वयाच्या ४० शीनंतरही सध्याच्या कामात मन न रमणा-यांची संख्या फार मोठी आहे. डीएमआयटी चाचणीच्या माध्यमातून फक्त पाल्य किंवा लहान मुलेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला योग्य क्षेत्रात कारकीर्द घडवून समाधानी आयुष्य जगण्यासाठी मदत होऊ शकते आज आपण युवा अथवा मध्यम वयीन व्यक्तींना हे माध्यम कशाप्रकारे मदतगार असू शकते, याबाबत माहिती घेणार आहोत.

युवक तसेच मध्यमवयीन व्यक्तींसाठी डीएमआयटी चाचणीचे फायदे-

>> आपली कौशल्ये ओळखा
>> आपली नैसर्गिक प्रतिभा आणि विशेष वैशिष्टय़े समजून घ्या.
>> सर्वात योग्य कारकीर्द फील्ड आणि नेतृत्व शैली ओळखा.
>> करिअर मार्गदर्शन चाचणीवर आधारित आपली व्यवस्थापनाची शैली जाणून घ्या.
>> आपल्या एमआय सिद्धांतावर आधारित आपण योग्य विभागत आहात हे जाणून घ्या.
>> मॅकेन्झी सिद्धांतावर बुद्धिमत्ता ओळखा.
>> हॉलंडच्या सिद्धांतावर आधारित कारकिर्दीसाठी योग्य असलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकार जाणून घ्या.

जन्मजात गुण, व्यक्तिमत्त्व, याच्या आधारे योग्य व्यक्ती योग्य जागी असल्यास व्यक्ती आपल्या कामाबद्दल वा कारकिर्दीबद्दल समाधानी आणि यशस्वी होऊ शकते. याच सोबत इतर कलागुणांना प्रोत्साहन मिळाल्यास कामकाजातील कार्यक्षमताही वाढू शकते.

नवीन काही शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. म्हणूनच तुमचे एखादे कौशल्य जे आवड म्हणून तुम्हाला जपावेसे वाटत असेल, तर त्याचे प्रशिक्षण नक्की घ्यावे. हल्ली गाण्याची आवड असणा-यांसाठी गाण्यांचे क्लासेस जागोजागी आढळतात. यामध्ये बहुतांश वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या व्यक्तीचा सहभाग मोठय़ा प्रमाणात आढळतो. प्रपंच सांभाळण्यामध्ये वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या ब-याच महिलांनी पाककलेमध्ये प्रावीण्य मिळवले आणि युटय़ूब चॅनेलद्वारे व्हीडिओच्या माध्यमातून स्वत:च्या रेसिपी प्रसिद्ध करून प्रसिद्धीही मिळविली आणि अर्थार्जनही करीत आहेत. अशी विविध क्षेत्रांतील अनेक उदाहरणे आहेत.

(संचालक बिल्ड पीपल अ‍ॅकॅडमी प्रा. लि.)
(संपर्क ९८६९५६०४६९)