X Close
X
9819022904

माझ्या पाठीत खंजिर खुपसणारेही अडचणीत


Mumbai:

अहमदनगर : भाजप नेते एकनाथ खडसे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीसह त्यांच्यावर झालेल्या कारवाईशी संबंधित काही खुलासे माध्यमांसमोर केले. माझ्या राजकीय जीवनात अनेक नेते माझ्यासोबत आले. काही लोक मला मिळाले, मोठय़ा जागेवर बसले, मात्र त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांनाही त्रास होत आहे, ते अडचणीत सापडले आहेत. आता त्यांना वाटत असेल की, एकनाथ खडसे बरोबर असते तर वेगळी स्थिती असती, असेही ते म्हणाले.

माझ्यावर दाऊदच्या पत्नीशी बोलल्याचा आणि पत्नीच्या नावावर जमिनी घेतल्याचे आरोप केले गेले. त्याच्या सर्व चौकशीला मी सामोरे गेलो, त्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. जाणूनबुजून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले. सध्या तरी दोन वर्षे माझा आत्मचरित्र लिहिण्याचा विचार नाही.

मात्र, त्यानंतर मी नक्की लिहिणार आहे. ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या नावासह त्यात उल्लेख जरूर करेन. मी घेतलेल्या काही निर्णयांचाही त्यात उल्लेख करेन, असे खडसे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘ते’ अडचणीत सापडलेले कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे.

साईबाबांचा मी भक्त आहे, गेल्या अनेक वर्षापासून मी शिर्डीला येतो. एरव्ही लोक जिंकून आल्यानंतर दर्शनाला येतात. मात्र, मी लेकीच्या पराभवानंतरही दर्शनाला आलो आहे. साईबाबांनी दिलेली श्रद्धा आणि सबुरीची शिकवण मी मानत आजपर्यंत पक्षावर श्रद्धा ठेवली आहे. आज बाबांना हेच विचारले की, आणखी किती दिवस श्रद्धा ठेवू? असेच राहू की, पुढे काय करू? आता हे साईबाबाच मला सांगतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.