X Close
X
9819022904

मराठा आरक्षण : ‘एसईबीसी’अंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश रद्दच, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच


medical-prescrip

नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातंर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. दरम्यान, यामुळे राज्य सरकारला झटका बसला आहे.

नागपूर खंडपीठाने निकाल रद्द ठरवून प्रवेश प्रक्रिया ठरल्यानुसार सुरू ठेवावी, अशा आशयाची याचिका राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेली पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. आज राज्य सरकारने याबाबतची आकडेवारी कोर्टात दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवताना एसईबीसी अंतर्गंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले.

(PRAHAAR)