X Close
X
9819022904

मंत्र्यांच्या पीएना शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात ‘नो एंट्री’; पण का?


Mumbai:

मंदिर प्रशासनाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

नाशिक (प्रतिनिधी) : शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या आजी-माजी आमदार, खासदार तसेच विश्वस्तांच्या पीएंना मंदिर परिसरात नो एन्ट्री असणार आहे. नेते मंडळींचे पीए किंवा एजंटद्वारे येणाऱ्या भाविकांना चाप लावण्यासाठी शिर्डी साईबाबा मंदिर प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मंदिरात दररोज व्हीआयपी दर्शन घडवण्यासाठी मोठी गर्दी असल्याचे लक्षात घेऊन संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत थेट आदेशच काढले आहेत.

शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज हजारो भाविक साई चरणी लिन होतात. मात्र दर्शनाच्या नावाखाली अनेकदा भाविकांची फसवणूक होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच साईबाबांच्या श्रद्धेपोटी भाविक लाखो रुपये, सोने-चांदी तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. अशावेळी महाराष्ट्रासह देशभरातून नागरिक शिर्डीला येत असतात. त्यामुळे या सर्वांचे दर्शन सुलभ होणे महत्वाचे आहे. मात्र अनेकदा व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मंदिर परिसरात टोळी कार्यरत असल्याचे समोर आले होते. नेतेमंडळी किंवा लोकप्रतिनिधी हे नेहमी शिर्डीला येत असतात. त्यामुळे काही लोक लोकप्रतिनिधींच्या नावाखाली पीए असल्याचे सांगून तर भाविकांना दर्शन घडवत असल्याचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेतला आहे.