X Close
X
9819022904

भाईंदरमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानमित्त जनजागृती कार्यक्रम


Mumbai:

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय मतदार दिनानमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्र विभागाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या मतदार जनजागृती कार्यक्रमात एकूण ६८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात विनय पाल व झोहराशेख या विद्यार्थ्यांनी ‘मतदानाचे महत्व’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यासोबतच मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला मतदार नोंदणी अधिकारी १४६ ओवळा माजिवाडा मतदार संघ यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले होते. ठाणे तहसिलदार आशिष बिरादर व मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग अधिकारी योगेश गुनिजन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अभिनव महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ आणि प्राचार्य डॉ.आॉल्विन मेनेजेस यांनी देखील कार्यक्रमा दरम्यान प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे लिपिक संतोष पेढणेकर यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरूणा गूजर, प्राध्यापक नितिन सोनावणे यांनी कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.