X Close
X
9819022904

भद्रकाली पोलिस झाले सजग, मनपा भानावर येईना; पंधरा हॉटेल्सला नोटीस, केवळ शॉप ऍक्टवर चालतो व्यवसाय


Mumbai:

नाशिक : दै. प्रहारने दोन दिवस सातत्याने भद्रकालीतील बेकायदेशीर हॉटेल व्यावसायावर वृत्तांकन केल्यानंतर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले असून भद्रकाली पोलिसांमार्फत अशा बेकायदेशीर हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. दैनिक प्रहारच्या वृत्ताची तूर्तास पोलिसांनी गंभीर दखल घेतली असली तरी ही भूमिका नव्या नवरीचे नऊ दिवस ठरू नयेत अशी प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची इच्छा आहे.

दुसऱ्या बाजूला महापालिका अजूनही भानावर यायला तयार नसल्याने पोलिसांवर कारवाईचा नाहक भार पडत येत असल्याचेही काही स्थानिक अभ्यासू नागरिकांचे म्हणणे आहे. दैनिक प्रहारने संबंधित वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी आपल्या हद्दीतील सर्व हॉटेल व्यवसायिकांची तातडीने बैठक घेऊन कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना करून विनापरवाना हॉटेल सुरु ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. यासोबत काल रात्री एका मोठ्या हॉटेलवर वेळेचे बंधन पाळले नाही म्हणून कारवाई केल्याचे वृत्त आहे. दरम्यान भद्रकाली पोलिसांनी सोमवारी जवळपास १५ हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.