X Close
X
9819022904

बाबा म्हणतील ते..


Mumbai:

शिवसेनेचे पोस्टरबॉय चर्चेतून गायब

मुंबई : आदित्य ठाकरे आहेत कुठे? सत्तास्थापनेच्या चर्चेत आदित्य ठाकरे नाहीत.. ‘हीच ती वेळ’ म्हणत ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून लॉन्च करण्यात आले.. ते आदित्य ठाकरे शिवसेनेचे फक्त पोस्टर मुख्यमंत्री ठरणार का? बाळासाहेबांना वचन दिले आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनतेला साद घातली आणि हीच वेळ साधत आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंगही झाले आणि निवडणुकीत उभे राहिलेले पहिले ठाकरे निवडूनही आले.. पण, निकालानंतर अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही.. शिवसेनेच्या मनातले हे मुख्यमंत्री केव्हाच पोस्टरवर आले आणि गावभर पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

निकाल लागल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिक, कोकणात शेतीची पाहणी केली. शेतक-यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे राज्यपालांनाही भेटले. पण, सत्तासंघर्षाच्या या तिढय़ाच्या चर्चेत आदित्य ठाकरे कुठेच नाहीत. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये युतीची चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रभारी ओमप्रकाश माथुर यांच्याबरोबर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना पाठवले होते. त्यावरून भाजप नेत्यांचे बिनसलेही होते.

पण, आता ज्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून समोर आणण्यात आले, ते सत्तास्थापनेच्या या चर्चेत कुठेच नाहीत. ‘बाबा म्हणतील ते’, एवढेच म्हणत आदित्य ठाकरे शिवसेनेचे सध्या तरी पोस्टरबॉयच राहिले आहेत.