X Close
X
9819022904

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे


Mumbai:

‘महाराष्ट्र भूषण’ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आज जन्मदिन. दि. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. मुंबई, सांगली, पुणे येथे शिक्षण झालेल्या पुलंनी काही काळ प्राध्यापकी केली. नाटकांतून काम करायचे वळण तर महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू होते. त्याच्या जोडीला संगीत, चित्रपट, लेखन अशी क्षेत्रे लाभली आणि सुरू झाला प्रवास एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा! अशी सर्व क्षेत्रे काबीज केलेला आणि मराठी भाषा समृद्ध करणारा, मराठी माणसाच्या हृदयात चिरंतन स्थान मिळवणारा हा एकमेव प्रतिभावंत.

मराठी भाषा समृद्ध करणारा, मराठी विनोदाला नवी परिमाणे देणारा, आपल्या बहुरूपी प्रयोगाद्वारे मराठी रंगभूमीच्या क्षमता विस्तारणारा हा कलावंत. लोककलांमधून मुक्त अभिनय करून त्यांनी रंगभूमीच्या क्षमता विस्तारणारा हा संचित अनुभव नव्या पिढीला दिला.

वाचकांची मनं काबीज करणारी व्यक्तिचित्रे लिहिली, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘ती फुलराणी’, अशी नाटके, ‘बटाटय़ाची चाळ’सारखे एकपात्री प्रयोग, ‘खोगीरभरती’, ‘अपूर्वाई’, ‘असा मी असामी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी किती पुस्तके सांगावीत! आपल्या कलागुणांच्या बळावर मिळवलेले लाखो रुपये समाजाच्या समृद्धीसाठी त्यांनी सत्पात्री वाटले.

सर्वसामान्य माणसाचे उदंड आणि निर्लेप प्रेम ज्याला लाभले, असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व! पुणे मुक्कामी १२ जून २००० रोजी त्यांना मृत्यू आला. आज त्यांचा जन्मदिन