X Close
X
9819022904

पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर


Mumbai:
वर्षा तापकीर सरचिटणीस तर स्वरदा बापटांच्या खांद्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

पुणे : पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर (Pune City BJP executive) करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध सेलच्या अध्यक्षांचा समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी १९ जुलै रोजी राज्यातील ५३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्या जिल्हाध्यक्षांनी आता दोन महिन्यांनी आपापल्या कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर अखेर आज नवी कार्यकारणी जाहिर झाली आहे. यात माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

यात प्रतीक देसरडा यांच्यावर शहर भाजपा युवा मोर्चा प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. तर गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्या खांद्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नामदेव माळवदे व अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी भीमराव साठे तर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी इम्तियाज मोमीन व व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्ष

१. विश्वास ननावरे
२. प्रशांत हरसुले
३. मंजुषा नागपुरे
४. जीवन जाधव
५. सुनील पांडे
६. शाम देशपांडे
७. प्रमोद कोंढरे
८. अरुण राजवाडे
९. तुषार पाटील
१०. स्वरदा बापट
११. योगेश बाचल
१२. भूषण तुपे
१३. संतोष खांदवे
१४. महेंद्र गलांडे
१५. रुपाली धाडवे
१६. हरिदास चरवड
१७. गणेश कळमकर
१८. प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)

सरचिटणीस

१. वर्षा तापकीर (भाजपा महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
२. राजेंद्र शिळीमकर
३. रवी साळेगावकर
४. सुभाष जंगले
५. राघवेंद्र मानकर
६ . पुनीत जोशी
७. राहुल भंडारे
८. महेश पुंडे

चिटणीस

कुलदीप सावळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे, प्रविण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुष्यंत मोहोळ