X Close
X
9819022904

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंदची हाक


Mumbai:

प्रहार वेब टीम

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली परिसरात हैदोस घातला आहे. आज रविवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंद पुकारला आहे. रस्त्यावरील झाडे तोडून गडचिरोलीतील एटापल्ली – आलापल्ली मार्ग नक्षलवाद्यांकडून बंद पाडण्यात आला आहे. 

गडचिरोलीत 27 एप्रिलला चकमक झाली होती. यात रामको आणि शिल्पा या दोन महिला माओवादी ठार झाल्या होत्या. त्यांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात जांभुळखेडा, दादापूर, रामगड, कुरुंडी, चिखली या भागात नक्षलवाद्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवेसह इतर वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील एटापल्ली-आलापल्ली मार्गवर झाडे तोडून मार्ग बंद केला आहे. छत्तीसगड कांकेरहून एटापल्ली मार्गही बंद करण्यात आला आहे.