X Close
X
9819022904

देशाला १९४७ ला मिळाली ती भीक; खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ मध्ये


kangana ranaut 30-6-16

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या बेधडक व्यक्तव्यांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना बोलताना कसलाही विचार करत नाही. नुकताच कंगनाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मात्र त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत कंगनाने केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर रान पेटलं आहे. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळल्याचं कंगनाने म्हटलं आहे. यापूर्वी मिळाली ती भीक होती, अशा शब्दांत कंगनाने सगळ्या स्वातंत्रवीरांचा अपमान केल्याने सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल केले जात आहे.

कंगनाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात कंगना म्हणते, ‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेताजी बोस यांना माहीत होते की, स्वातंत्र्य लढ्यात रक्त वाहणार. पण ते रक्त्त भारतीयांचे नसावे. तेव्हा मिळाले ती भीक होती. ते स्वातंत्र्य नव्हते. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ला मिळाले. तसेच, ‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळाले, तर ते स्वातंत्र्य असेल का?’असा प्रश्न तिने विचारला. कंगनाच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर कडाडून विरोध होत आहे.

स्वरा भास्करने हा व्हीडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तर वरुण गांधी यांनीही ट्विट करत ‘कधी महात्मा गांधींचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान, कधी नेताजी, मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या त्यागमूर्तींचा अपमान. या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ असे म्हटले आहे. नेटकऱ्यांनीही अशा अनेक प्रतिक्रिया देत कंगनाला विरोध केला आहे. कंगनाच्या या वक्तव्याचे त्रीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

(PRAHAAR)