X Close
X
9819022904

तडीपार आरोपीचा भाजपच्या जिल्हाध्यक्षावर तलवारीने प्राणघातक हल्ला


2-mumbai

भाईंदर : मीरा रोड येथिल पूनम सागर परिसरातून आपल्या कार्यकर्त्यासमवेत जात असलेल्या भाजपाच्या उत्तर प्रदेश सेलचे जिल्हाध्यक्ष आशुतोष मिश्रा यांच्यावर तडीपार गुंडासह तीन जणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात आशुतोष गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

भाजपाच्या उत्तर प्रदेश सेलचे जिल्हाध्यक्ष आशुतोष मिश्रा हे पूनम सागर परिसरातील पदाधिकारी बिपिन सिंह यांच्या समवेत जात असताना रिक्षातून आलेल्या तडीपार असलेला शहनवाज खान उर्फ सोनू मेंटल आणि त्याच्या दोन साथीदारांनी आशुतोष मिश्रा आणि बिपिन सिंह यांच्यावर तलवारीने हल्ला करून पळून गेले.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवून जखमी अवस्थेत आशुतोष मिश्रा आणि बिपिन सिंह यांना भाईंदरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. आशुतोष गंभीर जखमी असून बिपिनची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांनी शहनवाज खान उर्फ सोनू मेंटल याला अटक केली आहे. दरम्यान सोनू मेंटलच्या दोन साथीदारांपैकी सलाउद्दीन खान हा सीतास्वप्ना इमारतीच्या गच्चीवरून पडून जागीच मरण पावला. पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद घेतली आहे तर अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत. तडीपार गुंड शहरात उघडपणे फिरत असल्याचे उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

(PRAHAAR)