X Close
X
9819022904

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा दफनभुमी स्वच्छता अभियान उपक्रम


8-mlv-001-696x422

मालवण: स्वच्छतेबरोबर सामाजिक ऐक्याचा संदेश देत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या दफनभुमीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सुन्नत जमातुल्ला मुस्लिम कब्रस्तान भरड, मुजावर मोहल्ला दफनभुमी पिराची भाट मेढा व जामा मस्जिद काझीवाडा-आचरा या मालवण तालुक्यातील दफनभुमी परिसरात स्वच्छता अभियान राबवत सुमारे १२ टन कचरा गोळा करण्यात आला. राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातुन राबवण्यात आलेल्या या अभियानात प्रतिष्ठानचे श्री सदस्य उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यात श्री बैठक मालवण, आंबेरी व चिंदर येथील ४७० श्री सदस्यांनी सहभाग घेतला. प्रतिष्ठानच्यावतीने सर्वांना कापडी हातमौजे व मास्क याची व्यवस्था करण्यात आली.

(PRAHAAR)