X Close
X
9819022904

ज्येष्ठांचे घरोघरी लसीकरणासाठी पालिका नियमावलीच्या प्रतीक्षेत


Mumbai:

मुंबई : न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका ६ महिन्यांपासून अंथरुणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन लस देणार आहे. पण राज्य शासनाची नियमावली अद्याप आलेली नाही. त्यामुळे ती आल्यानंतर आमची तयारी आहे, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप कमी आहे, असेही ते म्हणाले. लसींच्या एक शिशीत १० डोस असतात. एका घरात एकच ज्येष्ठ नागरिक असेल, तर मग ९ डोस वाया जाऊ शकतात. म्हणून मग घरातील इतर सदस्य लसीकरणाची मागणी करतील ते बरोबर होणार नाही, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांना डोस दिल्यानंतर तिथे अर्धा तास थांबावे लागेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून लस देता येऊ शकेल का? या बाबतचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. या काही उपाययोजना कराव्या लागतील, असेही सुरेश काकाणी म्हणाले.