X Close
X
9819022904

जेट एअरवेजचे कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या दारी


jet

मुंबई : जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने या कंपनीमध्ये काम करणाऱ्या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे शिष्टमंडळ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. आम्ही कमी पगारावर काम करण्यास तयार आहोत. मात्र जेटची सेवा पुन्हा सुरू व्हावी ही आमची मागणी आहे. यावर २३ मे नंतर हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे जेटच्या शिष्टमंडळाने सांगितले.

 

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने जेटचे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी या कर्मचाºयांनी दुसºया हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यास प्रारंभ केला आहे. यापैकी काही जणांना रोजगार मिळाला आहे. मात्र विदेशी हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये वैमानिक म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न करणाºया वैमानिकांसमोर तांत्रिक समस्येमुळे संकट उभे राहिले आहे.

जेटच्या काही वैमानिकांनी देशातील हवाई वाहतूक क्षेत्रासोबत विदेशातील हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र विदेशी कंपनीमध्ये वैमानिक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेले आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात येणारे प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे निर्माण झाल्याने त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. डीजीसीएने याबाबत वैमानिकांना सहकार्य करावे आणि आवश्यक प्रमाणपत्र त्वरित द्यावे जेणेकरून वैमानिकांना नवीन नोकरी मिळण्यासाठी साह्य होऊ शकेल, असे मत वैमानिकांनी व्यक्त केले आहे.

(PRAHAAR)