X Close
X
9819022904

छान किती दिसते फुलपाखरू, राणीबागेत ४० जातींची नवीन फुलपाखरे!


butterfly

मुंबई : भायखळा राणीबागेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन जातीचे प्राणी आणले जात असताना सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत फुलपाखरू! राणीबागेतील फुलपाखरू उद्यानात तब्बल ४० जातींची फुलपाखरे आल्याने पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. या नवीन पाहुण्यांच्या देखभालीसाठी विशेष उद्यान तयार करण्यात आले आहे.

भायखळ्याच्या राणी बागेत मुंबईसह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने येत असतात. राणीबागेतील पेग्वींन पर्यटकांचे आकर्षण ठरत असतानाच आता फुलपाखरूंमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तसेच लवकरच झेब्रा, कांगारू असे विदेशी प्राणी उद्यानात येणार असून त्यांच्या निवासासाठी पिंजरे बनवण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

काय आहे फुलपाखरू उद्यानात?
या फुलपाखरू उद्यानात फुलपाखरांसाठी मध देणारी आणि खाद्य पुरवणा-या खास झाडांची लागवड करण्यात आली आहे. फुलपाखरांच्या प्रजनन वाढीला चालना देणा-या खास झाडांची लागवडही या ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये इकझोरा, वेष्ठटेना, सोनटक्का, पेटास, मुसंडा, मधुमालती, कढीपत्ता, रूई, पानफुटी, नीरगुडी, गुंज अशी अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये फूड प्लांट आणि नेक्टरिंग प्लांट अशी लागवड करण्यात आली आहे.

(PRAHAAR)