X Close
X
9819022904

गणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई श्री’


Mumbai:

मुंबई : ‘नवोदित मुंबई श्री-२०१९’ स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाच्या गणेश उपाध्यायने बाजी मारली. गणेशने आपल्यापेक्षा वरच्या गटातील गटविजेत्यांवर चुरशीच्या लढतीत मात करीत जेतेपदावर नाव कोरले.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या संयुक्त आयोजनाखाली कांदिवलीच्या महावीर नगराजवळील शाम सत्संग भवनात झालेल्या नवोदित मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्रत्येक गटात ४०पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. ७० किलो वजनीगटातील स्पर्धकांची संख्या पन्नाशी पार केली. या स्पर्धेत एकंदर सात गटात २६५ शरीरसौष्ठवपटूंनी नशीब अजमावले.

अत्यंत चुरशीच्या ५५ किलो वजनी गटात पंपिंग आर्यनचा सतीश पुजारी, ६० किलो वजनी गटात गुरूदत्त जिमचा कल्पेश सौंदळकर सरस ठरला. ६५ किलो वजनी गटात शिवसमर्थचा संदीप सावळे अव्वल आला. ७० किलो वजनी गटात परब फिटनेसच्या अनिकेत यादवने बाजी मारली. पुढील तिन्ही गटांमध्ये गणेश उपाध्याय, प्रदीप कदम आणि प्रदिप भाटिया पहिले आले.

‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा निकाल : ५५ किलो वजनी गट (पहिले पाच विजेते) : सतीश पुजारी (पंपिंग आर्यन), नितेश पालव (सालम जिम), कार्तिक मंडल (बाल मित्र व्यायामशाळा), आशीष पवार (वेटहाऊज), अक्षय गव्हाणे (पॉवर फिटनेस). ६० किलो गट : कल्पेश सौंदळकर (गुरूदत्त), दीपक चौहान (भारत जिम), शशांक सकपाळ (व्ही. के. फिटनेस), नितिश निकम (अजय फिटनेस), सुमीत खैरे (कृष्णा जिम). ६५ किलो गट : संदीप साबळे (शिवसमर्थ जिम), वैभव जाधव (एचआर), सिद्धेश गाडे (पाठारे जिम), तेजस तळेकर (परब फिटनेस), किशोर गोळे (बॉडी वर्कशॉप). ७० किलो गट : अनिकेत यादव (परब फिटनेस), अल्मेश र्मचडे (रिबेल), नदीम अन्सारी (सावरकर जिम), रंजित भोर (परब फिटनेस), तुषार आग्रे (युथार्क फिटनेस). ७५ किलो गट : गणेश उपाध्याय (बाल मित्र मंडळ), अरविंद सोनी (आरकेएम), कुणाल शिंदे (हार्डकोर), सनी जमन (बाल मित्र), प्रशांत लाड (बाल मित्र). ८० किलो गट : २. प्रदिप कदम (टायगर फिटनेस), २. दीपक प्रधान (आरएम भट), कल्पेश नाडेकर (धर्मवीर), अजिंक्य कदम (मसल फिटनेस), मोहम्मद सईद (आरएम भट). ८० किलोवरील गट : १. प्रदिप भाटिया (अलेक्सर जिम), हिमांशू शर्मा (पाठारे जिम), सम्राट ढाले (सावरकर जिम), मोहित डोनाल्ड (कृष्णा जिम), प्रतीक यादव (लाईफ टाइम). ‘नवोदित मुंबई श्री’ : गणेश उपाध्याय (बाल मित्र मंडळ)