X Close
X
9819022904

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू


052716 bb early-fire-main03012019105047

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात एका इमारतीला आज सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे इमारतीतील ६ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. या भीषण आगीमध्ये शकुंतला रमाणी या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भीषण आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागामध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी ६ वाजून ५६ मिनिटाच्या सुमारास प्रिमियम कंपाऊंड मधील कोहिनूर सिटी येथील बिल्डींग क्रमांक ७ च्या चौथ्या मजल्यावर अचानक इमारतीला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोन इमारतीच्या दहाव्या मजल्यापर्यंत पसरले. भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

(PRAHAAR)