X Close
X
9819022904

काम पूर्ण होण्याआधीच दुसरे कंत्राट


Mumbai:

मुंबई (प्रतिनिधी) : शहरात १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्याचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने वेळेत प्लान्ट उभारलेले नसताना ३२० कोटींचे दुसरे काम देण्यात आले. मुंबईत महापालिकेत गैरव्यवहार सुरू असून कंत्राट रद्द करण्याची आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमित साटम यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेने ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्याचे ८४ कोटींचे कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेले आहे. मुंबई शहरात १६ ऑक्सिजन प्लान्ट उभे करण्यात येणार आहेत. ३० दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे होते. आता ३२ दिवस पूर्ण होऊनही काम पूर्ण झालेले नाही.

८४ कोटींचे दिलेले काम पूर्ण झालेले नसताना मुंबई महापालिकेने ३२० कोटी रुपयांचे नवे काम पुन्हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. यापूर्वीही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने राणीच्या बागेत पेंग्विनचे इनक्लोझर बनवण्याचे काम केले होते. पुन्हा त्याच कॉन्ट्रक्टरला पुन्हा ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे काम देण्यात आले आहे.