X Close
X
9819022904

ओडिशात ‘फनी’ धडकले; एक ठार, वा-याचा वेग ताशी 200 किमी!


fani1
भुवनेश्वर : चक्रीवादळ फनी अखेर आज सकाळी 10 च्या सुमारास ओडिशातील पुरी भागातील किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळाचा वेग ताशी 175 ते 240 या दरम्यान होता. यासोबतच किनारपट्टी भागात पावसाने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली. या वादळात झाड पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. फनी वादळ ओडिशा किनारपट्टीवर अंदाजे सहा- सात असेल त्यानंतर आज रात्री हे वादळ रात्री बंगालमध्ये दाखल होईल तर उद्यापर्यंत बांगलादेशात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ओडिशातील 15 जिल्ह्यातील 11 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 1999 मध्ये आलेले सुपर चक्रीवादळानंतर फनी हे वादळ सर्वात विध्वंसक मानले जात आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सुरक्षादले हायअलर्टवर आहेत. कोणत्याही गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेव्ही, एयरफोर्स आणि कोस्टगार्डला हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. ईस्ट कोस्टर्न रेल्वेने आतापर्यंत 103 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशामधील 11 जिल्ह्यात आचार संहिता हटविण्यात आली आहे. आंध्रसह ओडिशातील किनारपट्टी भागात राहणा-या सुमारे 11 लाख लोकांना सुरक्षित स्थानी हलविण्यात आले आहे. 880 मदत छावण्या उभारल्या गेल्या आहेत. सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशातील गंजाम, पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर आणि कटकमध्ये जोरदार वृष्टी होत आहे. फनी वादळ आतापर्यंतचे सर्वात विध्वंसक चक्रीवादळ ठरू शकते. ओडिशात 1999 मध्ये आलेल्या सुपर चक्रीवादळ (सुपर सायक्लॉन)मुळे सुमारे 10 हजार लोक मारले गेले होते. स्थानिक हवामान खात्याचे माजी संचालक शरद साहू यांच्या माहितीनुसार, ओडिशात 1893, 1914, 1917, 1982 आणि 1989 च्या उन्हाळ्यात वादळे आली होती. मात्र, यंदाचे चक्रीवादळ हे बंगालची खाडी तापल्याने तयार झाले आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ अतिशय विध्वंसक असू शकते. महाराष्ट्राला दिलासा फनी वादळामुळे महाराष्ट्राला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वत्र पारा 42 ते 46 अंशापर्यंत गेला होता. मात्र, फनी वादळ आल्यामुळे राज्यातील तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची उकाड्यातून काही दिवसाकरिता का होईना सुटका झाली आहे. (PRAHAAR)