X Close
X
9819022904

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात महिलेच्या छळाचा गुन्हा दाखल


dattu 6-8-16
नाशिक : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत २०१६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा नौकानयनपटू दत्तू भोकनळवर विरूध्द एका महिला पोलीस कर्मचा-याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला असून, दत्तूवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, दत्तू आणि त्या फिर्यादी महिलेने दोन वर्षांपूर्वी पुण्यात वैदीक पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर दत्तूने तिला पुन्हा थाटामाटात लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु दोनवेळा तारीख ठरवूनही दत्तू लग्नाला हजर राहिला नाही आणि त्यानंतर त्याने संबंध तोडण्यास सांगितल्याचा दावा महिलेने केला. या दोन वर्षांत दत्तूने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. दत्तूने २०१६ च्या आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची, तर २०१८ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे. (PRAHAAR)