X Close
X
9819022904

एचएएलची ३०० फायटर विमाने हवाई दलाच्या ताफ्यात


Mumbai:

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीची जवळपास ३०० फायटर आणि बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भारतीय हवाई दलाकडून सरकारला सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हा संपूर्ण व्यवहार अब्जावधी डॉलर्सचा आहे.

तेजस मार्क-२ चे दहा स्क्वाड्रन, ३६ अ‍ॅडव्हान्स मीडियम (एएमसीए) फायटर विमाने तसेच नवीन बनवण्यात आलेली एचटीटीपी-४० ही ट्रेनर विमाने एचएएलकडून खरेदी करणार असल्याचे आयएएफने सरकारला सांगितले आहे. एअर फोर्स प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी जाहीर केलेली एअरफोर्सची ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

एअर फोर्सच्या एका स्क्वाड्रनमध्ये १६ ते १८ फायटर विमाने असतात. तेजसच्या सुरुवातीच्या व्हर्जनची ४० फायटर विमाने आयएएफने आधीच विकत घेतली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तेजस मार्क-१ ची ८३ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी होईल. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे.

दुस-या अंडरवॉटर न्यूक्लियर मिसाइलचे आज परीक्षण
डीआरडीओने८ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनमच्या किना-यावर के-४ न्यूक्लियर मिसाइलचे परीक्षण करणार आहे. हे परीक्षण पाण्याच्या आत बनलेल्या प्लॅटफॉर्मवरून केले जाईल. या मिसाइलची साडेतीन हजार किमीलोमीटर दूरवरील शत्रूला मारण्याची क्षमता आहे. ही भारताची दुसरी अंडरवॉटर मिसाइल आहे. यापूर्वी ७०० किलोमीटर मारक-क्षमता असलेली बीओ-५ मिसाइल भारताने बनवली आहे. के-४ देशातील दुसरी अंडरवॉटर मिसाइल आहे. न्यूक्लियर आम्र्ड सबमरीन असलेला भारत जगातील सहावा देश आहे.