काबुल/नवी दिल्ली : राजकीय अस्थैर्यामुळे गत दोन वर्षांपासून अफगाणिस्तानला तीव्र अन्नधान्य टंचाईचा सामना करावा लागत आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या मूल्यांकनानुसार, अफगाणिस्तान हा अत्यंत अन्न असुरक्षितता असलेल्या देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक संकटे आणि उपासमारीने ग्रस्त आहेत. दरम्यान भारताकडून अफगाणिस्तानला १० हजार मेट्रीक टन गहू मदत केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी २० हजार मेट्रिक टन आणि २०२२ मध्ये भारताने अफगाणिस्तानला ४० हजार टन गव्हाची मदत केली होती.
याबाबत युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्राममार्फत माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानला अन्नाची तीव्र गरज असल्याने भारताकडून ही मदत करण्यात आली आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फॉर फूड प्रोग्रामकडून (UNWFP) भारताने मदत केलेले ट्वीट करून माहिती दिली. UNWFP यांनी दिलेल्या ट्वीटनुसार, १० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानमधील महत्त्वाच्या हेरात या शहरात पोहोचला. मागच्या महिन्यात भारत सरकारने देशातील मानवतावादी संकटा दरम्यान इराणच्या चाबहार बंदराचा वापर करून २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवला.
अफगाणिस्तानच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मदत वितरणाच्या माध्यमांचा विस्तार करून अफगाणिस्तानच्या स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने नेहमीप्रमाणेच सहकार्याचा हात पुढे केला आहे.
अफगाणिस्तानमधील खामा प्रेसने म्हटले आहे की गेल्या महिन्यात भारत सरकारने ईराणच्या चाबहार बंदरातून देशातील मानवी संकटादरम्यान, अफगाणिस्तानला २०,००० मेट्रिक टन गहू पाठवला होता. यापूर्वी ४०,००० टन गव्हाची मदत पाकिस्तानमार्गे करण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील स्थिरता आणि समृद्धीसाठी भारताने आपले योगदान दिले आहे असे खामा प्रेसने म्हटले आहे.
दरम्यान, तालिबानच्या अधिन अफगाणिस्तान सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. देशातील महिलांना मौलिक अधिकारांपासून वंचित करण्यात आले आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या आकलनानुसार अफगाणिस्तान अत्याधिक अन्न असुरक्षा असलेल्या देशांपैकी एक आहे. नऊ दशलक्ष लोक गंभीर आर्थिक परिस्थिती आणि भुकेने त्रस्त आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला आहे.
(PRAHAAR)