मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवून येत आहे. या थंडीचा परिणाम केवळ सर्वसामान्यांच्या जीवनमानावर नाही, तर फळ-पिकांच्या उत्पादनावरही झाला आहे. त्यामुळे राज्यातील निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येणार आहे. ‘पंतप्रधान फळपीक विमा योजना अंतर्गत’ फळपीक विमा देण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे अधीक्षक कृषि अधिकारी (मनरेगा) विनयकुमार आवटे यांनी दिली.
ही योजना फळपिक निहाय अधिसूचित केलेल्या जिल्ह्यामधील, तालुक्यातील, महसूल मंडळात राबवण्यात येते. सदर योजना कार्यान्वीत करणारी विमा कंपनी, शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतक-यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.
संत्रा, डाळिंब, केळी, काजू, आंबा, द्राक्ष पिकांसाठी कमी तापमानाचे निश्चित करण्यात आलेले हवामान धोके (ट्रिगर) आणि त्यानुसार देय होणारी नुसाकन भरपाई खालील प्रमाणे
* संत्रा – सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१९
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ३ दिवस १२ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – १९ हजार २५० रूपये
* डाळिंब – सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ डिसेंबर २०१८ते ३१ जानेवारी २०१९
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग २ दिवस १० डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – १८ हजार १५० रूपये
* केळी – सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ नोव्हेंबर २०१८ते २८ फेब्रुवारी २०१९
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ३ दिवस ८ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – ३३ हजार रूपये
* काजू – सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ डिसेंबर २०१८ते २८ फेब्रुवारी २०१९
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – ११ हजार ४५० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – १७ हजार १५० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – २८ हजार ६०० रूपये
* आंबा – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – ४ हजार ३०० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – ८ हजार ५८० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – १२ हजार २०० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ६ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – १६ हजार ५०० रूपये
– हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ७ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – २४ हजार २०० रूपये
* आंबा – अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, नांदेड, वाशिम, बीड, जालना, धुळे, बुलढाणा, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ जानेवारी २०१८ते २८ फेब्रुवारी २०१९
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये) – सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम – ३६ हजार ३०० रूपये
* द्राक्ष – नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला कालावधी – १ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९
– दैनंदिन तापमान ३.५१ डिग्री सेल्सिअस ते ४ डिग्री सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेल्यास – ९ हजार ९०० रूपये
– दैनंदिन तापमान २.५१ डिग्री सेल्सिअस ते ३.५० डिग्री सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेल्यास – १४ हजार ८५० रूपये
– दैनंदिन तापमान ३.५१ डिग्री सेल्सिअस ते ३ डिग्री सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेल्यास – १९ हजार ८०० रूपये
– दैनंदिन तापमान २.०१ डिग्री सेल्सिअस ते २.५० डिग्री सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेल्यास – २९ हजार ७०० रूपये
– दैनंदिन तापमान २.०० डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी नोंदले गेल्यास – ४९ हजार ५०० रूपये