मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याचे मतदान गुरूवारी देशभर पार पडत आहे. देशाच्या विविध राज्यातील ९५ मतदारसंघामध्ये मतदान होत असून मतदानाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. या मतदानला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. Maharashtra: Maharashtra Congress chief and sitting MP from Nanded Ashok Chavan casts his vote at a polling station in Nanded parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/0bLxI6FGU1 — ANI (@ANI) 18 April 2019 Agra: UP Congress chief Raj Babbar and party’s candidate from Fatehpur Sikri casts his vote at the polling booth in Radha Ballabh Inter College, for #LokSabhaElections2019 pic.twitter.com/l1rLK9F88C — ANI UP (@ANINewsUP) 18 April 2019 महाराष्ट्रात अकोला, बीड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर आणि बुलढाणा या १० मतदार संघात मतदान होत आहे. बीडमध्ये प्रितम मुंडे-बजरंग सोनावणे, अमरावती मतदारसंघातून नवनीत कौर राणा- आनंदराव आडसुळ, सोलापुरात सुशीलकुमार शिंदे- प्रकाश आंबेडकर-जयसिद्धेश्वर शिवाचार्य, उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह पाटील-ओमराजे निंबाळकर, नांदेडमध्ये अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांसह राजकीय नेते, कलाकार यांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. खासदार हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, रजिकांत, कमल हसन आदी राजकीय नेते, कलाकारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वलाताई शिंदे, मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क Tamil Nadu: Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan and his daughter Shruti Haasan queue up outside polling station 27 at Alwarpet Corporation School in Chennai to cast their votes. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ufeYNJ3pdM — ANI (@ANI) 18 April 2019 Tamil Nadu: Actor turned politician Rajinikanth casts his vote at the polling station in Stella Maris College, in Chennai Central parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/NfD3llN4J1 — ANI (@ANI) 18 April 2019 (PRAHAAR)