भुवनेश्वर : २०१८ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये यजमान भारतासमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. ‘क्रॉसओव्हर’ फेरीमध्ये मंगळवारी दुस-या सामन्यात नेदरलँड्सने कॅनडावर ५-० असा विजय मिळवत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले.
लार्स बाक याने १६व्या मिनिटाला नेदरलँड्सचे खाते उघडले. त्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये २०व्या मिनिटाला रॉबकर्ट केम्पेरमॅन याने त्यात भर घातली. उर्वरित तीन गोल तिस-या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये झाले. डॅम व्हॅन याने ४०व्या आणि ५८व्या मिनिटाला असे दोन गोल केले. ४१व्या मिनिटाला थिएरी ब्रिन्कमन याने गोल केला.
पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात ‘क्रॉसओव्हर’ फेरीमध्ये पहिल्या लढतीत बेल्जियमने पाकिस्तानचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
बेल्जियमतर्फे अलेक्झांडर हेन्ड्रिक्स (दहाव्या मिनिटाला), थॉमस ब्रिल्स (१३व्या मिनिटाला), सेड्रिक चार्लियर (२७व्या मिनिटाला), सेबॅस्टियन डॉकियर (३५व्या मिनिटाला) तसेच टॉम बुन (५३व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तान संघ एकही गोल करू शकलेला नाही.
बुधवार (१२ डिसेंबर)
अर्जेटिना वि. इंग्लंड
वेळ : सायं. ४.४५ वा.
ऑस्ट्रेलिया वि. फ्रान्स
वेळ : सायं. ७ वा.
गुरुवार (१३ डिसेंबर)
भारत वि. नेदरलँड्स
वेळ : सायं. ४.४५ वा.
जर्मनी वि. बेल्जियम
वेळ : सायं. ७ वा.