दहिवडी : सकल मराठा समाज खटाव व माण यांच्या माध्यमातून दहिवडी येथे मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी मराठा सन्मान व संघर्ष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चा मध्ये ज्या युवकांनी योगदान दिले आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या प्रगतीसाठी जे समाज कार्य करत आहेत त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दहिवडी बाजार पटांगण येथे हा सन्मान व संघर्ष मेळावा होणार आहे.
या मेळाव्याला छत्रपती श्री. उदयनराजे भोसले, मराठा भूषण तानाजी सावंत, नानासाहेब जावळे पाटील, सुनील काटकर, शरद काटकर, हरीश पाटणे, सुरेश नलावडे, तानाजी सावंत, महेश डोगरे हे उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाज एकत्रित यावा. सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अडचणी येतात, त्यावर कशी मात करावी याबाबत प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा माण व खटाव यांच्या समन्वयकांनी सांगितले.
()