प्रहार वेब
सिंधूदुर्ग: करुळ येथे होळी उत्सवाचे औचित्य साधून मंगळवार दि. 26 मार्च रोजी रात्री 10 वा. महिला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. चैतन्य महिला दशावतार नाट्य मंडळ बांदा यांचा दिमाखदार कर्मभोग हा दशावतार नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे.
होळीमांड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे. गावात शिमगोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. यानिमित्त मांडावर विविध धार्मिक कार्यक्रम वतनदार व ग्रामस्थ यांच्या वतीने पार पाडले जात आहे. दररोज रात्री पालखी नृत्य कार्यक्रम संपन्न होत आहेत. या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण होळीमांड भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीने फुलून जात आहे. मंगळवारी महिला दशावतार कार्यक्रम संपन्न होत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वतनदार व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.