X Close
X
9819022904

LIVE : भारत बंदला सुरूवात, अंधेरीत रेल्वे अडवली, पुण्यात बसची तोडफोड


fire

सकाळी १०.०० : मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई डी. एन. नगर स्थानकात दोन्ही बाजुंची मेट्रो सेवा बंद पाडली.

सकाळी १०.०० : दिंडोशी – गोरेगाव परिसरात मनसे रस्त्यावर

सकाळी १०.०० : दादर स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रूळावर उतरून रेल्वेसेवा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना हटविले. यावेळी भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित. काँग्रेस – भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.

सकाळी १०.०० : जागृती नगर येथे मेट्रो रेल्वे बंद पाडल्याने मनसेचे वॉर्ड अध्यक्ष शैलेष वानखेडे यांना पार्क साईट पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळी ९.५७. पोलिसांनी संजय निरूपम यांना ताब्यात घेतले. मीडियाच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुकी. मोदी सरकारविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.

सकाळी ९.५० : संजय निरूपम यांनी पुन्हा रेल्वे रूळावर उडी मारली. पोलिसांचा गोंधळ उडाला. कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अनेक ताब्यात घेतले. अंधेरी स्थानकात गोंधळ.

सकाळी ९.५० : वाशी नाका, प्रतिक्षानगर येथे बेस्ट बसेसवर दगडफेक

सकाळी ९.५० : दहा मिनिटांनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत. पोलिसांनी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी रेल्वे रूळावरून हटविले.

सकाळी ९.४० : अंधेरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली. कार्यकर्त्यांनी रूळावर उतरून आंदोलन सुरू. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम यांचा सहभाग. माहिमवरून रेल्वेने आलेल्या काँग्रेस नेत्यांनी रेल्वे रूळावर आंदोलन.

सकाळी ९.४० : औरंगाबाद : पेट्रोलपंप बंद आहेत. बस वाहतूक व इतर व्यवहार सुरळीत.

सकाळी ९.४० : मुंबई : दादर येथील भाजीपाला बाजारात व्यवहार सुरळीत आहेत.

सकाळी  ९.४० : सांगली : कर्नाटकातून येणा-या बस बंद. बाजारपेठा बंद आहेत. व्यवहार ठप्प. शाळा व महाविद्यालये मात्र सुरळीत. एसटी बसेस सुरळीत. राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनाही बंदमध्ये सहभागी.

सकाळी ९.३० : नवी  दिल्ली : राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रामलीला मैदानापासून आंदोलनाला सुरूवात होणार. अन्य सगळ्या पक्षाचेही नेतेही सहभागी होणार.

सकाळी ९.३० : उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बंदला चांगला प्रतिसाद. सपा, राजदचा बंदमध्ये सहभागी.

सकाळी ९.३० : नाशिक : बस स्थानकांमधून बस बाहेर पडत नाहीत. प्रवाशी ताटकळले. एसटी बस सेवा बंद.

सकाळी ९.२० : नागपूर : दैनंदिन व्यवहार सुरळीत. १० वाजल्यानंतर कॉंग्रेसचे नेते रस्त्यावर येऊन लोकांना बंदचे आवाहन करणार आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त

सकाळी ९.१० : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अंधेरी येथे आंदोलनात सहभागी होणार. माहिमवरून चव्हाण रेल्वेने अंधेरीला येणार.

सकाळी ९.१० : पुण्यात खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश पेट्रोलपंप बंद ठेवले आहेत.

सकाळी ९.०० : मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी शाळाही सुरळीत. पालकांनी मुलांना शाळेत न पाठविल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी.

सकाळी ९.०० : चेंबूर येथे आंदोलन करणा-या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळी ९.०० : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत बंदचा अद्याप कोणताही परिणाम नाही. बस वाहतूक, रेल्वे वाहतूक सुरळीत. नवी मुंबई भाज्यांची आवक सुरळीत. दुध वाहतूक सुरळीत.

सकाळी ८.३० : कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राजघाटावर पोचले. महात्मा गांधींच्या समाधीचे घेतले दर्शन. थोड्याच वेळात राजघाटावरून आंदोलनाला होणार सुरूवात. राहूल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार आदी नेते धरणे आंदोलन करणार

सकाळी ८.३० : संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते अंधेरी येथे आंदोलन करणार

सकाळी ८.३० : मुंबई – ठाण्यात बंदचा काहीही परिणाम नाही. बस व रेल्वे वाहतूक सुरळीत

सकाळी ८.३० : मनसेकडून नाशिकमध्ये निदर्शने, बसेस अडवल्या. पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.

सकाळी ८.०० : मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त.

सकाळी ८.०० : बंदला सुरूवात. पुण्यात बसची तोडफोड

(PRAHAAR)