X Close
X
9819022904

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आमटे दाम्पत्याचा सहभाग


kaunbanegacrorepati

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या प्रश्नमंजूषा ‘शो’च्या ‘कर्मवीर’ या विशेष भागामध्ये सहभागी होणार आहेत. ‘केबीसी’चे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘ट्विटर’वरून ही माहिती दिली.

छोटय़ा पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ‘रिअॅलिटी शो’ ठरलेला ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शोचे हे १०वे वर्ष आहे. आमटे दाम्पत्यांमुळे दहाव्या हंगामाची सुरुवात आगळय़ावेगळय़ा पद्धतीने होणार आहे. आमटे दाम्पत्यांसोबतच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याबाबत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.

‘‘डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन महान माणसांच्या सहवासामध्ये जवळपास तासभर राहण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले आहे. त्यांचे जीवन आणि आदिवासींसाठी करत असलेले काम प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही. अत्यंत उल्लेखनीय असे ते काम आहे. ‘केबीसी’च्या ‘कर्मवीर’ भागाच्या निमित्ताने आमटे दाम्पत्यांना जवळून अनुभवता माझ्यासोबत होते,’’ असे अमिताभ यांनी सांगितले.

‘केबीसी’च्या ‘कर्मवीर’ या विशेष भागाचे प्रक्षेपण ७ सप्टेंबर २०१८ रोजी केले जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांचे बंधू विकास आमटे यांनी अमिताभ यांच्या ‘ट्विट’ला ‘रिट्विट’ करताना हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले आहे.

(PRAHAAR)