X Close
X
9819022904

‘एचएमयूएन इंडिया २०१८’मध्ये १५०० विद्यार्थ्यांचा सहभाग


HMUN

हार्वर्ड इंटरनॅशनल रिलेशन्स कौन्सिल (आयआरसी)च्या सहकार्याने वर्ल्डव्ह्यू एज्युकेशनने हार्वर्ड मॉडेल युनायटेड नेशन्स (एचएमयूएन) भारतच्या आठव्या आवृत्तीचे यशस्वीरीत्या आयोजन केले. विद्यार्थ्यांना जागतिक नेत्यांना भेडसावणा-या आणि जागतिक स्तरावर या समस्यांच्या प्रतिसादात ठराव मांडण्याचे मुद्दे सांगण्याची एक रोमांचक संधी उपलब्ध करून दिली. यात १५०० हून अधिक विद्यार्थी होते, ज्यांनी भारतासह, ब्राझील, सिंगापूर, अफगाणिस्तान आणि ओमानसारख्या देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांचे प्रतिनिधित्व केले.

एचआयसीसी, हैदराबाद येथे १२ ते १५ ऑगस्ट २०१८ दरम्यान आयोजित कार्यक्रमातील ‘अ‍ॅक्ट टू इंपॅक्ट’ या थीमप्रमाणे, २०१८ च्या परिषदेत उपस्थित असलेले प्रतिनिधी १६ सिम्युलेटेड समित्यांशी संलग्न झाले. ज्यामुळे ‘कॅपॅसिटी बिल्डिंग आणि दहशतवादाचा सामना’, ‘सायबर क्राईम’, ‘सायबर सुरक्षा आणि सायबर वॉरफेअर’ यासारख्या काही जागतिक प्रश्नांवर अर्थपूर्ण चर्चा झाली. विद्यार्थ्यांना पत्रकारांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली.

वर्ल्डव्ह्यू एज्युकेशनचे सीईओ सम्प्रीथ रेड्डी म्हणाले, ‘एचएमयूएन इंडियाने संयुक्त राष्ट्राच्या आदर्शाचे समर्थन केले आहे आणि एसडीजींना संबोधित करताना सक्रिय सहभाग घेणा-या प्रत्येकाला प्रोत्साहित केले आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुन्हा या वर्षी आम्हाला उद्योग, सरकार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग पाहिले. विद्यार्थ्यांची सध्याची पिढी या समस्या सोडविण्यास इच्छुक असावी, असे आम्हाला वाटते आणि घरी परतल्यावर त्यांनी सकारात्मक कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे.

किंबहुना, एचएमयूएनमध्ये आयोजित केलेले सार्वत्रिक गट जेन-झीच्या अभ्यासाशी सुसंगत आहेत, जे आम्ही या परिषदेत कार्यरत करीत आहोत. ज्यामुळे आम्हाला भविष्यातील पिढीच्या बोलण्याचे आकलन करणे शक्य होईल. जेन-झी हे सॉल्व्हर्सचे भविष्य निर्माते आहेत, ज्यासाठी आम्ही त्यांना शिकण्यासाठी, कार्य करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी संधी आणि व्यासपीठ प्रदान करीत आहोत.

(PRAHAAR)