X Close
X
9819022904

सिडको महागृहनिर्माण योजनेसाठी भरघोस प्रतिसाद, अर्जांनी केला १ लाखांचा आकडा पार


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : सिडकोतर्फे जाहीर करण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह जमा झालेल्या अर्जांची संख्या १ लाख ३ हजार २०७ इतकी आहे. सदर गृहनिर्माण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१८ असून उर्वरित दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

https:lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर जाऊन अथवा अँड्राॅइड मोबाईलधारक सिडको गृहनिर्माण योजना २०१८ या अॅपच्या माध्यमातूनदेखील सहज व सुलभपणे सदर योजनेत अर्ज करू शकतात, असे सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले.