X Close
X
9819022904

संकष्टी पावावे…नव्हे ‘संकटी पावावे’, बाप्पाच्या आरतीतील चुकांचा पाढा व्हायरल!


IMG-20180911-WA0072
प्रहार वेब टीम मुंबई : सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भक्तमंडळी सज्ज आहे. गणपतीत आरतीचा गजर करत, बाप्पाचे स्वागत करणा-या भक्तगणांचा वेगळाच उत्साह असतो. पण ही उत्साही मंडळी आरती म्हणताना सर्रास चुका करते. ‘जय देव जय देव जय मंगलमूर्ती’ या आरतीत भक्तगण हमखास चुका करतात. ‘संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे’ नव्हे…‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’, ‘ओटी शेंदुराची…नव्हे उटी शेंदुराची’ अशा गणपती आरतीत सर्रास होणा-या चुकांचा पाढा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरातील चिमुकली मंडळी, तरूणाई इतकेच नव्हे तर मोठ्या मंडळींकडूनही या गंमतीशीर चुका होतात. आरतीचा ताल लागत असाताना, मधूनच कोणीतरी चुकीचा शब्द उच्चारतो आणि प्रत्येकजण त्याच्याकडे टक लावून बघायला लागतो. गणपती आरती म्हणतात या आरतीत होणा-या चुका आणि आरतीतील मूळ शब्द काय आहेत, हे सांगणारे फोटो व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल होत आहेत.       (PRAHAAR)