X Close
X
9819022904

शिवसैनिकांच्या हातात भाजपचे कमळ


Mumbai:

प्रहार वेब टीम

मुंबई : ‘सबका साथ सबका विकास’ या न्यायाने काम करणा-या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणा-याचा ओघ सातत्याने वाढत आहे. घनसावंगी विधानसभा मानेपुरी येथील नाराज शिवसैनिकांनी शिवसेनेला सोडचिट्टी देत बुधवारी भाजपचे कमळ हाती घेतले.

राज्याचे पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश वाघ महाराज, पुरुषोत्तम जायभाये, पंकज निकम, मछिंद्र घुले, गजानन वाघ, राजेश वाघ व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

आम्ही ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत प्रत्येक कामाला गती दिली. परंतु पैशाच्या जोरावर घनसावंगी विधानसभेची उमेदवारी शिवसेनेने हिकमत उढाण यांना दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिवसेना डावलते व नाकर्त्या नेत्यांना पैशासाठी उमेदवारी देते, असा आरोप रमेश वाघ महाराज यांनी केला आहे. याआधीही अनेकदा उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाकडून देण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी शिवसेनेने आमची उमेदवारी ऐनवेळी डावलली. म्हणून आम्ही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे रमेश वाघ महाराज यांनी सांगितले.