X Close
X
9819022904

शिक्षकांच्या सम्मानासाठी ‘शिक्षक भारती’ दिल्लीत धडकली


teachersdat

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी देशभरातल्या शिक्षकांनी संसद मार्ग ते जंतरमंतर मैदानापर्यंत काढला भव्य मोर्चा 

प्रहार वेब टीम

नवी दिल्ली : ‘शिक्षकों के सम्मान में शिक्षक भारती राजधानी दिल्ली में’ अशा घोषणा देत शिक्षक भारती या शासन मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेने नवी दिल्ली दणाणून सोडली.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा. कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करा. प्रत्येक कंत्राटी कामगार कर्मचा-यांना सेवेत नियमित करून किमान वेतन २६ हजार रुपये देण्याचे धोरण लागू करा. सर्व शाळा-कॉलेजांना १०० टक्के अनुदान द्या. या व इतर महत्वाच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसोबत शिक्षक भारतीने पालिका बाजार संसद मार्ग ते जंतरमंतर मैदानापर्यंत जाणा-या भव्य मोर्चात सहभाग घेतला. शिक्षक भारती या शासन मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राभरातून शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, सेंट्रल ट्रेड युनियन, केंद्रीय कर्मचारी संघटना व देशपातळीवरील सर्व संघटनांनी या मोर्चाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरात केंद्र व राज्य सरकारविरुद्ध कोट्यवधी कर्मचा-यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. या मोर्चात देशभरातून लाखो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

(PRAHAAR)