X Close
X
9819022904

विमान उतरविण्याच्या नौटंकीत गणरायाचा अपमान, विमानाच्या लगेजमधून मूर्तीचा घडवला प्रवास


aitrigeg
Mumbai:प्रहार वेब टीम सिंधुदुर्ग : एचडीएल कंपनीचे खासगी विमान भाड्याने घेऊन चिपी विमानतळावर विमान उतरविण्याची नौटंकी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली. चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळालेले आहेत. त्यामुळे सुरक्षेची कोणतीही तजवीज केली गेली नसल्याने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू किंवा हवाई वाहतूक मंत्रालयाचे संबंधित अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. केवळ चमकोगिरी करून श्रेयवाद लाटण्यासाठी आणि स्वत:चा हट्ट पुरविण्यासाठीच विमानातून गणपती आणण्यात आला. गणरायाची ही मूर्ती चक्क विमानात जिथे लगेज ठेवतात, त्या भागातून आणली गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी केलेल्या या उठाठेवीबद्दल माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी संताप संताप व्यक्त केला आहे. ‘रोपटं लावलं राणे साहेबांनी आणि वटवृक्ष झाल्यावर सावलीत बसलाय केसरकर. अभिनंदन सिंधुदुर्ग!!!’, असे ट्विट माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. तर गणरायाला सीट वरून ताटात किंवा पाटावर बसवून आणले पाहिजे होते. मात्र लगेजमधून पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गणपती आणणा-या केसरकरांचा धिक्कार असो, असा निषेध आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ‘तयारी सगळी गाववाल्यानी करायची आणि आरतेक आयतो येवन मुंबयकारान उभो रवाचा तो सुद्धा अनधिकृतपणे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा चिपीचा विमान लॅडिंग!!’ अशा कोकणी भाषेत ट्विट करुन आमदार नितेश राणे यांनी केसरकर यांची खिल्ली उडवली आहे. तसेच ‘गणरायाची मूर्ती विमानाच्या लगेजच्या भागामधून आणुन अपमान करणा-या दीपक केसरकरांचा निषेधही नितेश राणे यांनी केला आहे. चमकूगिरीच्या नादात गणरायाचा हा अपमान कधीच सहन नाही करणार!!!,’ असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह व्हीव्हीआयपी लोकांच्या विमान लॅन्डिंगचे स्वप्न केसरकर यांनी दाखविले होते. १२ सप्टेंबरला विमानसेवा सुरू होईल. मी आश्वासन देत नाही, तर ते पाळतो अशी मल्लिनाथीही केसरकर यांनी केली होती. पण प्रवाशांशिवाय विमान उतरविण्याचा देखावा केसरकर यांना करावा लागला आहे. गणरायाला सीट वरून ताटात आणायला पाहिजे होते .. लगेज मधून या पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गणपती आणले धिक्कार असो केसरकारांचा !! निषेध !! pic.twitter.com/oWeG7ifozm — nitesh rane (@NiteshNRane) September 12, 2018 ✈️✈️✈️✈️✈️ तयारी सगळी गाववाल्यानी करायची…. आणि *आरतेक आयतो येवन मुंबयकारान उभो रवाचा तो सुद्धा अनधिकृतपणे*. .. याचा उत्तम उदाहरण म्हणजे आजचा चिपीचा विमान लॅडिंग!! — nitesh rane (@NiteshNRane) September 12, 2018 गणरायाची मूर्ती विमानाच्या luggage च्या भागामधून आणुन अपमान करणाऱ्या दिपक केसरकरांचा जाहीर निषेध!! चमकूगिरी च्या नादात गणरायाचा हा अपमान कधीच सहन नाही करणार !!! — nitesh rane (@NiteshNRane) September 12, 2018 रोपट्ट लावलं राणे साहेबांनी आणि वटवृक्ष झाल्यावर सावलीत बसलाय केसरकर. अभिनंदन सिंधुदुर्ग!!! https://t.co/hhLdadGl7h — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 12, 2018 या पार्श्वभूमीवर जिल्हावासीयांची झालेली फसवणूक व दिशाभूल मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार राणे यांनी दिला आहे. नारायण राणे साहेबांच्या संकल्पनेतील चिपी विमानतळ हा जिल्हावासीयांचा भावनिक विषय आहे. विमान लॅडींगची नौटंकी करुन त्यांच्या भवितव्याशी खेळ करणा-या केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी या प्रकाराबाबत जिल्हावासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ज्या दिवशी प्रवासी वाहतूक सुरू होईल तेच खरे उद्घाटन असेल. मात्र, साध्या डोमेस्टीक विमानासाठी लागणा-या परवानगीसाठीचा अर्जही केलेला नसताना केसरकर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्याची भाषा करीत आहेत. खोटे बोला पण रेटून बोला यातीलच हा प्रकार आहे. सत्ताधारीच असे खोटे बोलत असतील तर जनतेने कोणावर विश्वास ठेवावा. केवळ श्रेय लाटण्याचा हा सेनेचा प्रकार आहे. याआधी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी तत्कालिन केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या समवेत दिल्लीत झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा लावून न धरल्यानेच चिपी विमानतळाची धावपट्टी साडेतीन किलोमीटरवरून अडीच किलोमीटर झाली आहे. हे शिवसेनेचेच पाप असून सुभाष देसाई हा कोकणासाठी कसाईच असल्याची सडकून टीकाही नितेश राणे यांनी केली आहे. देसाई आणि केसरकर यांच्यामुळेच सिधुदुर्ग जिल्ह्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असा आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.