X Close
X
9819022904

राणी लक्ष्मीबाई यांच्यावर हॉलीवुडपट


Rani-Laxmi-bai-Relax

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना ‘झाशीची राणी’ अर्थात राणी लक्ष्मीबाई या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘सोर्ड्स अ‍ॅण्ड सेपटर्स’ नावाचा हॉलीवुडपट येत आहे. राणी लक्ष्मीबाईंची यशोगाथा जगाच्या कानाकोप-यात लवकरच पोहोचवणा-या ‘स्वोर्डस अ‍ॅण्ड सेपटर्स’ सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर आणि भरतनाटय़म विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील असे मराठीतील कसलेले कलाकारही पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी थोडय़ा फार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे. हॉलीवुडच्या धर्तीवर साकार झालेल्या ‘सोर्ड्स अ‍ॅन्ड सेपटर्स’ ची निर्मिती स्वाती भिसे यांनीच केली आहे. चार्ल्स सेलमोन हे सहनिर्माते आहेत. स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटिश सत्ताधीशांना धाडसाने सामोरे जाणा-या या रणरागिणीचा ‘सोर्ड्स अ‍ॅण्ड सेपटर्स’ हा इंग्लिश सिनेमा भारताबरोबरच संपूर्ण जगभरात लवकरच प्रदर्शित होणार आहे.

(PRAHAAR)