X Close
X
9819022904

मुंबई-पुणे महामार्ग जाम!, गणेशोत्सवाच्या सुट्टयांमुळे प्रवासी रवाना


express-way-new

मुंबई : गणेशोत्सवाच्या सुट्टयांमुळे प्रत्येकजण प्रवासासाठी रवाना झाला आहे. यामुळे मुंबई-पुणे महामार्ग पहाटेपासूनच जाम झाला आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी ७.३०च्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडला होता. यामुळे वाहतूक कोंडी झाली. किमात ३ ते ४ कि.मी. लांबीच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. सोबतच गणपतीची सुट्टी असल्यामुळे प्रत्येकजण प्रवासासाठी रवाना झाल्यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

 

 

(PRAHAAR)