X Close
X
9819022904

महाराष्ट्राच्या राहीने पटकावले सुवर्णपदक


asainagames

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले.

जकार्ता- भारताच्या राही सरनोबतने २५ मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी राहीने २०१४ साली झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

महिलांच्या २५ मी. पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली. राहीने अखेरच्या काही क्षणांमध्ये दमदार पुनरागमन केले आणि सुवर्णपदक पटकावले.

पात्रता फेरीत भारताच्या मनू भाकरने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामुळे तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या. पण पदक पटकावण्यात मनू अपयशी ठरली.

(PRAHAAR)