X Close
X
9819022904

मराठा आरक्षण : १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार


maratha-a

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचा प्रगती अहवाल सादर केला. तर मागासवर्ग समितीने येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिली.

मराठा समाजाला आरक्षण देताना त्यासाठी कालबद्धता निश्चित करावी, अशी मागणी करणारी याचिका अ‍ॅड. विनोद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र न्या. ए. ए. सय्यद आणि न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर होणारी ही सुनावणी आता हे प्रकरण न्यायालय क्रमांक तीनकडे वर्ग करण्यात आले. न्या. आर. एम. सावंत आणि न्या. के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता ही सुनावणी झाली.

आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षात मराठा समाजाने प्रचंड मोठे क्रांती मूक मोर्चे काढले होते. दोन महिन्यापूर्वी झालेल्या मराठा ठोक आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्याची कोर्टानेही दखल घेतली होती.

(PRAHAAR)