X Close
X
9819022904

भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘हैद्राबाद कस्टडी’


moviehyc

सुपरहिट ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटानंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मिती संस्था एका नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘हैद्राबाद कस्टडी’असे आहे. समाजमाध्यमांद्वारे ‘टीझर पोस्टर’च्या माध्यमातून चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. शीर्षक आणि ‘टीझर पोस्टर’वरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय पोस्टरवरील ‘थर्ड डिग्री’साठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणा-याचे लक्ष वेधून घेतो. सिनेमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वास्तवावर भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे ओळखले जातात. त्यांचे ‘ख्वाडा’, आणि ‘बबन’ हे दोन्ही सिनेमे त्याच धाटणीचे असल्यामुळे आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ हा सिनेमा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी सांभाळली आहे. या सिनेमाविषयी आणखी माहिती समोर आली नसली तरी लवकरच सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

(PRAHAAR)