X Close
X
9819022904

ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण केमोथेरपीच्या वेदना टाळू शकतात


breastcancer

नवी प्रिसिजन मेडिसिन पद्धत ब्रेस्ट कॅन्सरच्या हजारो रुग्णांना फायदेशीर ठरण्याची शक्यता असते. ऑन्कोटाइप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर टेस्ट केमोथेरपीची आवश्यकता नाही, अशा ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील ७०% महिला आणि केमोथेरपी अत्यावश्यक ठरेल, अशा ३०% महिला निश्चित ओळखू शकते, असे ट्रायल असाइनिंग इंडिव्हिज्युअलाइज्ड ऑप्शन्स फॉर ट्रीटमेंटच्या महत्त्वाच्या निष्कर्षामध्ये आढळले आहे.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांना केमोथेरपीचा सल्ला देण्याच्या बाबतीत मोठे बदल होणार आहेत. ऑन्कोटाइप डीएक्स टेस्टमुळे ऑन्कोलॉजिस्टना केमोथेरपी सुरक्षितपणे टाळू शकतात, असे कमी धोका असलेले रुग्ण आणि केमोथेरपीचा फायदा होऊ शकतो, असे उच्च धोका असलेले रुग्ण ओळखण्यासाठी मदत होणार आहे. ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांनाच केवळ केमोथेरपी देऊन केमोथेरपीचा वापर मर्यादित ठेवल्यास ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांत केमोथेरपीचा एकंदर वापर कमी केला जाऊ शकतो, असे मुंबईतील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनय देशमाने यांनी नमूद केले आहे.

आजवरची सर्वात मोठी ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट ट्रायल असलेला अभ्यास न्यू इंग्लंड जर्नलमध्ये जूनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यास नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थचा भाग असलेल्या युनायटेड स्टेट्स नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटने (एनसीआय) पाठिंबा दिला व ईसीओजी-एसीआरआयएन कॅन्सर रिसर्च ग्रुपने नेतृत्व केले आहे.

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा कॅन्सरचा प्रकार सर्रास आढळतो आणि महिलांमधील सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये त्याचे प्रमाण २७% आहे. दर १ लाखामागे २५.८ इतके प्रमाण असलेला हा कॅन्सर काही विकसित देशांपेक्षा कमी आहे. पण, पाश्चिमात्त्य देशांच्या तुलनेत मृत्यूदराची (दर १ लाखामागे १२.७) तुलना करायला हवी. भारतातील सहा मुख्य कॅन्सरच्या नोंदीतील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण पाहिले असता ते ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण ०.४६ ते २.५६% या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. जगभर, ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालेल्या बहुतेकशा रुग्णांमध्ये हार्मोन – पॉझिटिव्ह, एचईआर २ – निगेटिव्ह, नोड – निगेटिव्ह कॅन्सर असतो. यापैकी अंदाजे ७० टक्के रुग्णांना केमोथेरपी दिली नाही तरी चालेल, असे TAILORx अभ्यासाने निश्चितपणे दर्शवले. त्यामध्ये ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर X® रिझल्ट ० ते २५ असलेल्या ५० वर्षाहून अधिक महिला व ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर X® रिझल्ट ० ते १५ असलेल्या ५० वर्षे वा त्याहून कमी वयाच्या महिला समाविष्ट आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या ३० टक्के रुग्णांना केमोथेरपीचा फायदा होईल व यामध्ये ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर X® रिझल्ट २६ ते १०० असलेल्या कोणत्याही वयाच्या महिलांचा आणि ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर X® रिझल्ट २६ ते २० असलेल्या व केमोथेरपीमुळे किरकोळ (२ टक्के) फायदा झाल्याचे आढळलेल्या ५० वर्षाहून कमी वयाच्या महिलांचा समावेश असल्याचे आढळले व हे प्रमाण स्कोअर जसजसा २५ पर्यंत व त्याहून वाढला, तसतसे वाढले. या महत्त्वाच्या निष्कर्षामुळे तरुण रुग्णांसाठी केमोथेरपीची नवी प्रिसिजन पातळी निदर्शनात आली व ती केवळ ऑन्कोटाइप डीएक्स X® टेस्टमुळे समजू शकते.

“TAILORx च्या निष्कर्षामुळे, घातक केमोथेरपीचा खरंच फायदा होणार नाही, अशा हजारो महिलांना केमोथेरपीपासून मुक्तता मिळू शकते. केमोथेरपीचा खरेच कोणाला फायदा होईल, असे रुग्ण ओळखणारी आणि ज्यांना या उपचारांची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना केमोथेरपी व तिच्या घातक दुष्परिणामांपासून मुक्त करणारी, वैयक्तिक स्वरूपातील उपचार पद्धती वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने लक्षणीय प्रगतीची ठरणार आहे. जेनॉमिक हेल्थसाठी भारतातील एकमेव व्यावसायिक प्रतिनिधी या नात्याने, आम्ही भारतातील उपचारांतील प्रमाणकांमध्ये बदल आणू शकू, अशी अपेक्षा आहे, असे मेडिलिंक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद वैद्य यांनी सांगितले. ट्रायलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या जगभरातील ६ देशांतील १० हजार २७३ महिलांचा समावेश होता. अर्ली-स्टेज, एचआर – पॉझिटिव्ह, एचईआर २ – निगेटिव्ह, अक्सिलरी लिम्फ नोड – निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर अत्यंत अचूक व परिणामकारक उपचार सुचवण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा उद्भवण्याशी संबंधित असलेल्या २१ जिन्स एक्स्प्रेशनचे मूल्यमापन करणा-या ऑन्कोटाइप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर टेस्टचा वापर करण्यात आला. “TAILORx मध्ये सहभागी झालेल्या, ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर रिझल्ट ० ते १० असलेल्या रुग्णांना एनएसएबीपी बी-२० पाहणीच्या अगोदरच्या निकालांनुसार केवळ एंडोक्रिन थेरपी देण्यात आली व त्यांना केमोथेरपी देण्याची गरज वाटली नाही.

मध्ये सहभागी झालेल्या, ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर रिझल्ट २६ ते १०० असलेल्या रुग्णांना एनएसएबीपी बी-२० पाहणीच्या अगोदरच्या निकालांनुसार व त्यांना केमोथेरपीचा फायदा होईल असे आढळल्याने केमोथेरपी देण्यात आली आली. आजार पुन्हा उद्भवण्याचा अधिक धोका असलेल्या महिलांना केमोथेरपीचा होणारा फायदा अधिक अचूकपणे नमूद करण्यासाठी, “TAILORx मधील प्राथमिक पाहणी गटातील, ऑन्कोटाइप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर रिझल्ट ११ ते २५ असलेल्या, ६ हजार ७११ महिलांना केमोथेरपीसह किंवा केमोथेरपीविना रँडम पद्धतीने एंडोक्रिन थेरपी देण्यात आली. अशा रुग्णांमध्ये “TAILORx मध्ये सहभागी असलेल्या सर्व रुग्णांपैकी दोन-तृतियांश रुग्णांचा समावेश होता व त्यानंतर अभ्यासकांनी सरासरी अंदाजे नऊ वर्षे पाठपुरावा केला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील ऑन्कोसर्जन डॉ. मंदार नाडकर्णी यांनी नमूद केले, ‘‘ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांतील हा महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष प्रॅक्टिसिंग फिजिशिअन व ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्ण यांच्यासाठी अतिशय परिणामकारक ठरणार आहेत. अगोदर, जगभरातील बहुसंख्य ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला जायचा. केमोचे अनेक दुष्परिणाम रुग्णांना यातनादायी ठरतात. केमोथेरपीची गरज कोणत्या रुग्णांना आहे, हे ओळखता येईल व त्यांना केमोथेरपी देता येईल. तसेच ज्या रुग्णांना केमोथेरपीची फारशी आवश्यकता नसेल, त्यांना दिली जाणार नाही, हे ठरवण्यासाठी मदत करेल, जेणेकरून सार्वत्रिकीकरणाऐवजी, रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार उपचार देता येतील, अशा विश्वासार्ह साधनांची अपेक्षा डॉक्टर व रुग्ण या दोन्हींना दीर्घकाळापासून होती.

नामवंत ऑन्कोलॉजिस्ट व पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी सांगितले, ‘‘आज, पर्सनलाइज्ड मेडिसिनमुळे आम्हाला विशिष्ट गटातील रुग्णांच्या बाबतीत केमोथेरपी टाळणे शक्य झाले आहे. केमोची गरज कोणत्या रुग्णांना नाही, हे आम्ही ठरवू शकतो आणि ज्यांना गरज आहे, केवळ त्याच रुग्णांना केमो देऊ शकतो.’’ जेनॉमिक हेल्थविषयी – जेनॉमिक हेल्थ, इंक. (NASDAQ : GHDX) ही कॅन्सरवर चांगले उपचार करण्यासाठी मदत करतील, अशा जेनॉमिक-आधारित डायग्नॉस्टिक टेस्ट उपलब्ध करणारी आघाडीची कंपनी आहे. त्यामध्ये, सध्या आरोग्यसेवा क्षेत्रातील चर्चेचा विषय असलेल्या, आजारावर अति प्रमाणात उपचार करणे टाळणे, याचाही समावेश आहे. ऑन्कोटाइप आयक्यू जेनॉमिक इंटलिजन्स प्लॅटफॉर्ममुळे आजाराचे निदान होण्यापासून उपचाराची निवड व पाहणी इथपर्यंतच्या कॅन्सर रुग्णाच्या प्रवासादरम्यान उपचाराचे नियोजन करण्यासाठी क्लिनिकल व जेनॉमिक माहितीचे रूपांतर कृतीयोग्य परिणामांमध्ये करण्याच्या दृष्टीने कंपनी जागतिक दर्जाचे शास्त्रीय व व्यावसायिक कौशल्य अवलंबत आहे.

(PRAHAAR)